ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत झालेल्या हल्ल्याचा देऊळगाव राजा येथे महाविकास आघाडीने केला निषेध 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  देशातील सर्व सामान्य गरीब, पिडीत, वंचित, महिला, युवक व विद्यार्थी यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुलजी गांधी यांनी १४ जानेवारी २०२४ पासुन भारत जोडो यात्रेला सुरूवात केल्याचे सर्वश्रुत आहे. मणिपुर येथुन निघालेली ही यात्रा नागालॅंड, अरुणाचल ह्या राज्यातील प्रवास पुर्ण करून आसाम राज्यात दाखल झालेली आहे. यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता, भाजपा प्रणित आसाम राज्यात काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. त्यांच्या गुंडांनी भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला केला. खा. राहुलजी यांची बस अडवण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या या गुंडांनी केलेल्या हल्ल्यात आसाम काँग्रेस चे अध्यक्ष भुपेन बोरा यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

   सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा आवाज दडपवु पाहणाऱ्या भाजपच्या विरोधात २३ जानेवारी २०२४ रोजी *बस स्टँड चौक दे.राजा* येथे सकाळी 11 वाजता महाविकास आघाडी च्या वतीने तिव्र आंदोलन करून भाजप प्रणित गुंडगिरीचा निषेध केला,याप्रसंगी भाजप सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली, याप्रसंगी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गजानन काकड,शहर अध्यक्ष विष्णु झोरे,सेवादल चे तालुका अध्यक्ष गजानन तिडके,अनिल सावजी,आतिष कासारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,माजी नगरसेवक हनिफ शाह, रमेश कायंदे, लक्ष्मण कवळे,सुभाष दराडे प्रा,अशोक डोईफोडे,मुन्ना ठाकूर,अयुब शहा,फारूक कुरेशी, गणेश आडे,इस्माईल बागवान,सूर्याजी चव्हाण,सिध्दीक सेठ,मुबारक खान,रवी इंगळे,दीपक चेके, मतीन चाऊस तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये