Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नकोडा गावात मीटर बॉक्स आणि स्मार्ट मीटर बसवू नका : मोहम्मद हनिफ

चांदा ब्लास्ट

 नकोडा : गावात मीटर बॉक्स व स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्काळ बंद करावे, अशी मागणी गावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हनिफ यांनी विद्युत विभागाला निवेदनाद्वारे केली आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्रामस्थांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो, असे ते म्हणाले. या मीटरमुळे बिलांमध्ये असाधारण वाढ होऊ शकते, जी सर्वसामान्यांना मान्य नाही.

 मोहम्मद हनिफ म्हणाले की, गावातील लोक आधीच वाढती महागाई आणि इतर आर्थिक आव्हानांशी झुंजत आहेत. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवून त्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. वीज विभाग व संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या समस्या समजून घेऊन संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 विभागाने याकडे लक्ष न दिल्यास ग्रामस्थ आंदोलन करण्यास भाग पाडतील. हा प्रश्न उच्च पातळीवर मांडून न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मोहम्मद हनिफ यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये