ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पानठेल्यामधुन गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

   माननीय श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 11/07/2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन कारजा (घा.) हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून कारंजा (घा.) येथील नागपुर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 लगत मौजा नारा टि-पॉईंट येथील आरोपी क्र. 1) गोपाल विठ्ठलराव चाफले, वय 44 वर्ष, रा. खरडीपुरा वार्ड नं. 04 कारंजा (घा.), याचे रूद्र चाय व पान सेंटर नावाचे पानठेल्यामध्ये एन.डि.पी.एस. अॅक्ट अंतर्गत कार्यवाही केली असता, सदर आरोपी हा तेथे हजर मिळुन आला असुन, त्याचे पानठेल्याची झडती दरम्यान पानठेल्याचे काऊंटरखाली एका प्लास्टीक पिशवीमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आला असुन, सदरचा गांजा त्यास त्याचा नातेवाईक बहिण जावई आ.क्र. 2) सुजीत सोनी रा. कारंजा (घा.) जि. वर्धा याने आणुन दिल्याचे सांगितले. सदर दोन्ही आरोपी हे संगणमताने गांजा अंमली पदार्थांची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीच जप्ती पंचनामा कार्यवाही करून, ताब्यातील आरोपीचे ताब्यातुन निव्वळ गांजा अंमली पदार्थ 2.629 किलोग्रॅम जु.कि. 52,580 रू चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. रामनगर येथे एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, जप्त मुद्देमाल व आरोपीस पो.स्टे. कारंजा (घा.) यांचे स्वाधीन करण्यात आले आहेत व आ.क्र. 2 सुजीत सोनी हा फरार असुन, त्याचा शोध स्था.गु.शा. वर्धा चे पथक घेत आहे.

 सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं. नरेंद्र पाराशर, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, दिनेश बोथकर, मिथुन जिचकार, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, फॉरेन्सिक विभागाचे अनिल साटोणे, अजित धंदरे, मंगेश धामंदे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये