ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी समाजाचे दैवत भंगारा देविची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा

आदिवासी एकता संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   मौजा बेलोरा गावातील अरबिंदो कोलमाईन्सच्या लीज एरीयात गोंडीयन आदिवासी समाजाचे पुरातन भंगारा देवी स्थापीत होती.समाजातर्फे अरबिंदो कंपणीच्या पुनर्वसन कमेटीला विश्वासात घेऊन या मुर्तीला लिए एरीयाच्या बाहेर अन्यत्र विधीवत स्थापण करण्यात आले.मात्र काही बाहेरील लोकांनी परत त्या मुर्तीला उचलून जुन्या लीज एरीयामधे स्थापण केले.

यामुळे देविची विटंबना झाली असुन गोंडी धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.त्यामुळे या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी व समाजाला न्याय द्यावा अन्यथा याविरोधात समाजाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येइल असा इशारा गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटनेच्या वतिने तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी गोलू गेडाम,प्रमोद गेडाम,संदीप कुमरे,पिंटू मरसकोल्हे, महादेव सिडाम,संदीप नैताम,निरंजन आत्राम,बंडू कोडापे,प्रभाकर कुळमेथे आदी ऊपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये