ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे भर दिवसा मोटर सायकल लंपास 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील संतोष टॉकीज जवळील सागर किराणा दुकाना समोर ठेवलेली मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना 5 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.

दशरथ दिनकर गीते, रा गोंदणखेड हे त्यांच्या मोटार सायकल हिरो होंडा स्प्लेंडर प्लस काळया रंगाची MH28N7633 कि. अं. 15,000/रु किराना दुकानासमोर रोडवर उभी करुन किरानामध्ये सामान खरेदी करुन थोड्यावेळाने मोटार सायकल उभी केलेल्या ठिकाणी परत गेले असता त्यांना त्यांची नमुद मोटार सायकल त्याठिकाणी मिळुन आली नाही. मोटार सायकलचा आजु-बाजुला तसेच गावात शोध घेतला परंतु त्यांना मोटार सायकल मिळुन आली नाही.

अखेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ नायबराव मोगल करत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये