त्याग, बलिदान आणि निष्ठेची आठवण करून देणारा मोहरम – आ. जोरगेवार
आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतले हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली यांच्या समाधीचे दर्शन

चांदा ब्लास्ट
मोहरम हे केवळ एक उत्सव नाही, तर त्याग, बलिदान, निष्ठा आणि अन्यायाविरोधातील संघर्षाची आठवण करून देणारा दिवस आहे. इमाम हुसैन यांनी अन्यायाचा प्रतिकार करताना दिलेलं बलिदान हे केवळ मुस्लीम समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे, अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
मोहरम निमित्त चंद्रपूर कारागृहातील हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली दर्गा भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनीही चादर अर्पण करून नमन केले.या प्रसंगी जिल्हा कारागृहाचे अधिक्षक, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, तुषार सोम, बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, आशिष माशिरकर, रमजान अली घायल, राशिद हुसेन, सय्यद चाँद, राझीक खान, बशीर शेख, अबरार सय्यद, रमीझ हुसेन, शाहरूख मिरदा, शहबाज हुसेन, आतिकुल रहमान आदींची उपस्थिती होती.
आजच्या दिवशी आपण इमाम हुसैन यांच्या शौर्याला, निष्ठेला आणि धर्मासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करतो. आपला चंद्रपूर जिल्हा विविधतेने नटलेला आहे. येथे अनेक धर्म, जाती, पंथ एकत्र राहतात. एकमेकांचे सण, उत्सव, परंपरा सन्मानाने साजरे करतात हीच आपल्या जिल्ह्याची खरी ताकद आणि ओळख आहे असे आमदार जोरगेवार यांनी नमूद केले. यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली दर्ग्यावर दर्शन घेत व्यवस्थेचीही पाहणी केली.