लखमापूरच्या शाळेत राबविला “एक पेड मा के नाम” उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे शासनाने नेमून दिलेल्या एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये ऑक्सिजन हब ग्रामपंचायत लखमापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर यांच्या संयुक्त संयोजनाने ऑक्सिजन हब बनवण्यात आला.
एक पेड मा के नाम या उपक्रमाची सुरुवात 5 जुलै रोजी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक सोबतच ग्रामपंचायतचे लखमापूरचे सरपंच अरुण भाऊ जमनाके शाळेचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व, पालक यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम गावामध्ये वृक्षदिंडी प्रभात फेरी काढण्यात आली.
प्रभात फेरी वृक्षदिंडीमध्ये एक पेड मा के नाम च्या घोषणा वृक्ष लागवडीसाठी संवर्धनासाठी च्या घोषणा देऊन *वृक्षवल्ली आम्हा सोयरे* या गीतासह प्रभात फेरी संपूर्ण गावांमधून काढून पुन्हा शाळेत वृक्ष दिंडी आली.
सदरच्या वृक्ष दिंडी चे आयोजन ग्रामपंचायत लखमापुर सोबतच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर च्या वतीने ही दिंडी काढण्यात आली.
प्रति विद्यार्थी एक झाड लावून सेल्फी काढून एक पेड माके नाम हा उपक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर आणि ग्रामपंचायत लखमापूर व शाळेतील इको क्लब पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आला.
यासोबत शाळेमध्ये आणि गावाच्या परिसरामध्ये तब्बल 250 झाडाची लागवड करून त्याची संवर्धन करण्यासाठी सर्व शिक्षक,विद्यार्थी, पालक ,ग्रामपंचायत सदस्य यांनी शपथ घेतली.
सदरचा वृक्षदिंडीचा उपक्रम शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री विनोद क्षीरसागर व ग्रामपंचायत लखमापूरचे युवा सरपंच अरुण भाऊ जुमनाके यांच्या नेतृत्वामध्ये सदरचा उपक्रम राबविण्यात आला
“एक पेड मा के नाम” आणि शाळेच्या परिसरात ऑक्सिजन हब वृक्ष लागवडीसाठी उपस्थित… ग्रामपंचायतचे सर्व सदस्य शाळेतील सर्व शिक्षक आरोग्य विभागातील डॉक्टर येवले मॅडम कातकर मॅडम अंगणवाडी सेविका ठावरीताई मडावी ताई काकडे ताई सोबतच अभियंता ठावरी उपस्थित होते.