ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसमध्ये महसूल जमीन प्रकरणावरून नागरिकांमध्ये अस्वस्थता

काँग्रेसने दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : शहरातील अमराई, तिलक नगर, बँक ऑफ इंडिया मागील वस्ती, शालिकराम नगर, आंबेडकर नगर, शास्त्री नगर, बंगाली कॅम्प, गोपाल नगर, अजगर नाला परिसरातील सुमारे 1300 नागरिकांना महसूल जमिनीवरील घरे हटविण्याचे नोटीस तहसील कार्यालयाकडून देण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

वर्ष 2011 पूर्वीपासून महसूल जमिनीवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना घरपट्टे देण्याबाबत शासन तसेच सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचा समावेश आहे. मात्र, नगरपरिषदेने अद्यापपर्यंत घरपट्टे देण्याचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर न केल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

गेल्या 50 वर्षांपासून या भागात वास्तव्यास असलेले आणि नियमितपणे कर भरत असलेल्या नागरिकांना या नोटीसमुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सदर नोटीसा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस शहराध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदन देण्यात आले. यात संपूर्ण शहराचा सर्वंकष अभ्यास करून त्वरित ठराव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांना पुढील त्रास होणार नाही.

या वेळी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख, तालुका सचिव विशाल मादर, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, एस.सी.सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, एन.एस.यु.आय शहराध्यक्ष आकाश चिलका, बालकिशन कुळसंगे, रोहित डाकूर, दिपक पेंदोर, विजय माटला, सुनील पाटील, कुमार रुद्रारप, दिपक कांबळे, कपिल गोगला, सूरज मिश्रा, अनवर सिद्दीकी, शहंशाह शेख, अंकुश सपाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये