सोनुर्ली (वन) येथे शाळेच्या वृक्षदिंडीद्वारे पर्यावरण जतनाचा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोनुर्ली (वन) येथे दिनांक ५ जुलै २०२५ रोजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य वृक्षदिंडी उत्साहात काढण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपणाविषयी जनजागृती करणे हा होता.
विद्यार्थ्यांनी हातात झाडांची रोपे, फलक आणि घोषवाक्यांचे पत्रके घेऊन संपूर्ण गावात जनजागृती फेरी काढली. “झाडे लावा – झाडे जगवा”, “वृक्ष माझे जीवन”, “प्रत्येक घराजवळ एक झाड” अशा घोषणांनी गावामध्ये निसर्गप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.
या वृक्षदिंडीस प्रमुख पाहुणे म्हणून विलास देवाळकर (केंद्रप्रमुख, केंद्र सोनुर्ली) उपस्थित होते.
उपसरपंच अंकित लोढे, प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर लोढे, रोजगार सेवक अरविंद दुर्गे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संदीप मोहूर्ले व निकेश देवाळकर यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.
या उपक्रमाचे प्रभावी आयोजन मुख्याध्यापक बाळा बोढे, शिक्षिका प्रभावती हिरादेवे, मेनका मुंडे, शिक्षक विजय राऊत, सुनील अलोने, व शिक्षणप्रेमी पल्लवी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भरभरून स्वागत करत त्यांच्या पर्यावरणप्रेमाचे कौतुक केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.