ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहरम निमित्त जिल्हा कारागृह परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने शरबत वाटप

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर कारागृहातील हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली दर्ग्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शरबत वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शरबत वाटप स्थळी भेट दिली.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, तुषार सोम, बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, आशिष माशिरकर, रमजान अली घायल, राशिद हुसेन, सय्यद चाँद, राझीक खान, बशीर शेख, अबरार सय्यद, रमीझ हुसेन, शाहरूख मिरदा, शहबाज हुसेन, अतिकुल रहमान आदींची उपस्थिती होती.

हजरत हुसेन (र.अ.) हे इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू होते. मोहरमच्या दिवशी ते शहीद झाले होते. त्यामुळे या दिवसाची आठवण म्हणून मोहरमच्या नवमी आणि दहाव्या दिवशी चंद्रपूर कारागृहातील हजरत मखदूम उर्फ गैबीशाह वली यांचा दर्गा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो. यंदाही या दिवशी कारागृहातील दार खुले करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या भाविकांची सेवा म्हणून येथे आलेल्या हजारो भाविकांना शरबत वाटप करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये