ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्य वारीचे आयोजन

चांदा ब्लास्ट

 दि. 5 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीच्या शुभपर्वावर चांदा पब्लिक स्कूल येथे ‘विठ्ठल-रुख्मिणी पालखी सोहळा’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सरदार पटेल महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर, शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे आणि प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांनी भगवे झेंडे, टाळ मृदूंगाच्या गजरात विठ्ठल विठ्ठल’ जयघोष करीत वारकरी वेशात तर काही विठ्ठल-रुख्मिणी, संत नामदेव, मुक्ताई यांच्या पेहरावात (वेशात) वारीत सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारीचे महत्त्व सांगत संतांचे अभंग गायीले गेले. त्यानंतर निघालेल्या वारीतील ‘पालखीचे पूजन’ करण्यात आले. सजलेली पालखी, अभंग गायन, टाळ नृत्य सादर करत वारक-यांनी वातावरण भक्तीमय केले. कार्यक्रमात सादर झालेले संत यांचे ‘मला पंढरीला नेलं ग बया’ हे भारुड कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या डॉ. पद्मरेखा धनकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत म्हणाल्या, आजचा विद्यार्थी हा केवळ ए.आय. च्या जगात गुफटत चाललाय, त्यामुळे भारतीय संस्कृती, येथे साजरे होणारे सण-समारंभ याविषयी तुम्हा सर्वांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आणि शाळेतही त्याविषयी तुम्हा सर्वांना अशा रीतीने सणांचे महत्त्व अवगत करुन दिल्या जातात हे खरचं कौतुकास्पद आहे. चांदा पब्लिक स्कूल ही संस्कृती जपणारी शाळा आहे असेही त्या म्हणाल्या.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे, प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत वारीचे, वारीतील वारक-यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थी मनस्वी घुमडे, रुद्राणी ताम्हण, श्रावणी गजपुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडण्यात मराठी विषयाच्या शिक्षिका सौ. रेवती बडकेलवार, सौ. रोशना हजारे, सौ. प्रांजली गोवारदिपे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये