अवैध दारू विक्री करणाऱ्या दारूच्या गुत्त्यावर छापा
17 लाख 4 हजारावर मुद्देमाल जप्त ; आरोपीतांन विरूध्द गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 04.07.2025 रोजी मा. पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन यांनी दिलेल्या आदेशावरून हिंगणघाट परीसरात अवैध्य रीत्या दारूविक्रेत्यांनवर कार्यवाही कामी आम्ही पोनि विलास पाटील नेमणुक अर्थीक गुन्हे शाखा वर्धा व सहकारी पोलीस स्टॉफ पोउपनि शांताराम मुदमाळी सफौ संतोष जैयस्वाल पोहवा विरेन्द्र कांबळे पोहवा देर्वेन्द्र कडु नापोशि राजेश पाचरे पो. अंमलदार अविनाश निंबाळकर म.पो. अंमलदार प्रगति वाघमारे सर्व नेमणुक आर्थीक गुन्हे शाखा असे खाजगी वाहनाने हिंगणघाट शहरात जाऊन गोपनिय बातमीदारा कडुन माहीती काढली असता आठवडी बाजार मच्छी मार्केट परीसर येथे आरोपी नामे 01) विक्की शिवाजीराव चौधरी वय 32 वर्ष रा. विठठलमंदीर वार्ड हिंगणघाट 02) भारत चंद्रकांत उंडे वय 35 वर्ष रा रंगारी वार्ड हिंगणघाट हे अवैध्य रीत्या देशी विदेशी दारूचा गुत्ता चालवत असुन त्या मध्ये मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू विक्री करीत आहे अशी खात्रीशीर खबर प्राप्त झाल्याने दोन पंचा समक्ष कायदेशीर झापा मारला असता आठवडी बाजार मच्छी मार्केट हिंगणघाट येथील दुकाणा मध्ये वरील दोन्ही आरोपी प्रत्यक्ष हजर राहुन देशी विदेशी दारू विक्री करीतांना मिळुन आले. त्यांचे जवळुन देशी विदेशी दारू
01) सदर माल नेआन व वाहतुकी करीता एक टिव्हीएस कंपनीची ज्युपीटर जीचा क्र. एमएच 32 ए. वाय 1725 किं 70,000/-
02) देशी दारू प्रिमीयम 90 मीली च्या 108 निप्पा प्रति 100 रू प्रमाणे 10,800/-
03) देशी दारू भिंगरी 90 मीली व्या 10 निप्पा प्रति 100 रू प्रमाणे 1000/-
04) देशी दारू सोनी सोफ 90 2800/-मीली च्या 28 निप्पा प्रति 100 रू प्रमाणे
05) देशी दारू मॅगो 90 मीली च्या 34 निप्पा प्रति 100 रू प्रमाणे 3400/-
06) देशी दारू टैंगो पंच 90 मीली च्या 08 निप्पा प्रति 100 रू प्रमाणे 800/-
07) विदेशी दारू आरएस कंपनीचा 90 मीली च्या 26 निप्पा प्रति 150 रु प्रमाणे 3900/- 08) विदेशी दारू आरएस कंपनीचा 180 मीली च्या 09 निप्पा प्रति ३०० रू प्रमाणे 2700/- 09) टुबर्ग कंपनीच्या 500 मीली वाल्या काचेच्या बॉटल प्रति 300 रू प्रमाणे 900/-
10) दारू विक्रीचे नगदी 57050 रु
11) उधारी नोंद असलेले नोट बुक 10 रू
12) थंड पाण्याच्या 8 प्लॅस्टीक कॅन प्रती कॅन 400 रू प्रमाणे 3200 रु.
13) दारू पिण्याकरीता वापरलेले 10 ग्लास किंमत 100 रू
14) पैसे घेण्यासाठी एचडीएफसी बँकेचे स्कॅनर किंमत 300 रू
15) दारूच्या खाली बॉटल ठेवण्यासाठी वापरलेले 3 प्लास्टीक अप व एक प्लॉस्टीक खुर्ची किं 1000 रू
16) आरोपी विक्की चौधरी याचे ताब्यातुन विवो कंपनीचा जुना वापरता मोबाईल कि.8000
17) आरोपी भारत उंडे याचे ताब्यातुन ओप्पो जुना वापरता मोबाईल कि.४००० असा एकुण मुदेमाल किंमत 1,74,210 रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने वर दोन्ही आरोपीतांन कडुन वरील प्रमाणे मुद्देमाल हा दोन्ही पंचासमक्ष जप्त करण्यात आला आरोपी तांना अवेध्य दारूपुरवठा करणरे व दुकाण उप्लब्ध करून देणारे सहकारी 01) टुिन गवळी रा. हिंगणघाट 02) दुकाण मालक पप्पु मोहता रा. हिंगणघाट उत्तेजन दिल्याचे दिसून आले वरून चारही आरोपी यांनी पुर्वनियोजीत कट करून गुन्हा केल्याचे दिसून आल्याने वरील चारही आरोपी विरूध्द पोस्टे हिंगणघाट येथे अपराध क्रमांक 919/025 कलम 65 (अ) (ई), 68, 77 (अ), 81, 83 म. दा. का. सहकलम 3(1), 181, 130/177 मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दोन आरोपीतांना अटक करून हवालात बंद करण्यात आले.
स्दरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन पोलीस उपअधिक्षक पुंडलीक भटकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात करण्यात आली