ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणारे गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

   श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे आदेशीत केले होते, त्याअनुषंगाने दि. 04/07/2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून वर्धा रेल्वे स्टेशन गेट समोरील, वर्धा ते सावंगी मेघे रोडलगत असलेल्या दयासागर अंडा स्टॉल दुकाणाजवळ सापळा रचुन एन.डि.पी.एस. ॲक्ट अंतर्गत कार्यवाही केली असता, यातील आरोपी नामे 2) सुरज शंकरसिंग चव्हाण, वय 27 वर्ष, रा. बंगाली कॅम्प हनुमान मंदिराचे मागे इंदिरानगर रोड चंद्रपुर, ह.मु. ए.एम. मॉलचे मागे बेसा टि-पॉईंट 3) विजय नामदेराव दुधकवरे, वय 33 वर्ष, रा. मोहन कलसे यांचे घराजवळ इंदिरानगर आर्वी नाका वर्धा, हे आरोपी नामे 1) यश सुरेश बेमाल, वय 28 वर्ष, रा. सावंगी मेघे, राजु नगर देवळी रोड वर्धा व 4) अमिर नाशिर खॉ पठान रा. इंदिरानगर आर्वी नाका वर्धा यांचे सांगणेवरून रेल्वेने ओडिसा येथे गेले व तेथुन त्यांनी आरोपी 5) मदन सा नावाचा ईसमाकडुन गांजा अंमली पदार्थ खरेदी केला व तो दोन सुटकेसमध्ये भरून, वर्धा रेल्वे स्टेशन येथे परत आले.

सदरचा गांजा घेण्याकरीता आरोपी यष बेमाल व अमिर पठान हेसुध्दा घटनास्थळी त्यांचे कार ने हजर आले होते, आरोपी अमिर पठान यास पोलीसांची चाहुल लागताचं तो त्याचे ताब्यातील एका पांढ-या रंगाचे मारूती स्विफ्ट कारसह पळुन पसार झाला असुन, उर्वरित तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेवुन, जप्तीपंचनामा कार्यवाही करून आरोपीतांचे ताब्यातुन 1) निव्वळ गांजा अंमली पदार्थ 20.111 किलोग्रॅम कि. 4,02,220 रू 2) एक आयफोन मोबाईल कि. 80,000 रू 3) एक रेडमी कंपनीचा ॲॅन्ड्रॉईड मोबाईल कि. 10,000 रू 4) एक जिओ कंपनीचा कीपॅड मोबाईल कि. 3,000 रू 5) दोन सुटकेस कि. 8,000 रू, असा जु.कि. 5,03,220 रू चा मुद्देमाल. जप्त करून, सर्व आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन, वर्धा शहर येथे एन. डी. पी. एस. कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला, फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. प्रकाश लसुंते, बालाजी लालपालवाले, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, अक्षय राऊत, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व फॉरेन्सिक विभागाचे स.फौ. अनिल साटोणे, अजित धांदरे व पो.हवा. मंगेश धामंदे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये