श्रीसंत झिंगुजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
श्रीसंत झिंगुजी महाराज पुरुष बचत गटाचा प्रयत्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे
श्रीसंत झिंगुजी महाराज पुरुष बचत गट, भद्रावतीच्या वतीने रविवार दि.८ डिसेंबरला सकाळी १०:०० वाजता स्थानीय श्रीमान ठक्कर यांचे घराजवळ श्रीसंत झिंगुजी महाराज यांचे समाधीपूर्व निवास जागेवर मंदिर उभारून श्रीसंत झिंगुजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा धार्मिक विधीने विधिवत करण्यात आली.
सर्वप्रथम श्रीसंत झिंगुजी महाराज मंदिर येथे श्रींच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून भद्रावतीच्या प्रमुख मार्गाने भजन दिंडीसह वाजत गाजत मंदिर स्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. पंडित सुरेश भाके महाराज यांच्या हस्ते धार्मिक विधीने विधिवत पूजा अर्चना करून श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली.याप्रसंगी बचत गटाचे अध्यक्ष सुरेंद्र राऊत, माजी नगरसेवक नंदूभाऊ पढाल,गौरव नागपुरे,राजेश लांबट,राकेश मांढरे,सुभाष मारबते,पवन मांढरे,मधुकर पचारे,दिलीप मांढरे,गणेश कामतवार,कार्तिक मांढरे,हर्षद पारशिवे,नागेंद्र चटपल्लीवार,नरेश नागपुरे,सुनील मांढरे,श्रीराम रूयारकर, अशोक पढाल, स्वाती मांढरे,सविता दिघोरे,गंगा नागपुरे,पौर्णिमा कामतवार आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी गटातील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.