ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटारसायकलस्वारास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी 

दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

शहरातील रहिवासी अंकुश बाबुराव सावंत मोटारसायकलने वैयक्तीक कामासाठी कमळनाथ येथे जात असताना कमलनाथ मंदिराजवळ आरोपी सुरज भगवान शिंदे व सुरज चव्हाण यांनी त्याची मोटार सायकल थांबउन काही एक कारण नसतांना आरोपी सुरज शिदेने त्याचे हातातील कडे फिचे तोंडावर मारुन जखमी केले. तसेच अन्य आरोपी सुरज चव्हाण याने त्याचे हातातील लोखंडी गज फिचे डोक्यवर तसचे उजवे हाताचे करंगळीवर मारुन जखमी

केले. व दोघानी फिस शिवीगळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली, सदर घटना १० फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता घडली.फिर्यादी अंकुश सावंत यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक संजय गोरे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये