देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (अजित दादा) सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक समर्थ शैक्षणिक संकुल देऊळगाव राजा येथे आमदार .श्री.मनोजभाऊ कांयदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲड नाझेर काझी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जाताना पक्ष संघटनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्याअनुषंगाने पक्षवाढीसाठी आगामी काळात अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सिंदखेडराजा मतदारसंघातील विविध सेलच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व तसेच ईतर पदासाठी इच्छुकांनी दि 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत असे यावेळी ठरविण्यात आले!
यावेळी मा.देविदास ठाकरे,संतोष खांडेभराड,डॉ.नितिन पाटील,लक्ष्मण कव्हळे,शाम जाधव,प्रकाशभाऊ गिते,नितिन कायंदे,गजानन काकड,भगवान खरात,विनायक भानुशे,संतोष शिंगने,डॉ.गवारे,ब्रम्हा पाडमुख,कैलास मेहेत्रे,शेख यासिन,सिद्धु जाधव,विष्णु झोरे,आशीष पौंधे,गणेश डोईफोडे,नाजिम भाई आदी मान्यवर हजर होते!
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सदाशिव मुंढे यांनी तर प्रास्ताविक श्री.संतोष खांडेभराड यांनी केले,आभार श्री.प्रदीप वाघ यांनी मानले.