ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुजरी व आठवडी बाजार शुल्क निर्धारण फलक लावण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

 नगर परिषद घुग्घुसने आर्थिक वर्ष 2025-2026 साठी गुजरी व आठवडी बाजारासाठी नवीन शुल्क दरपत्रक जारी केले आहे. या दरानुसार विविध दुकानदार, फडवाले, हातगाडे, वाहन धारक व व्यवसायिक यांच्यावर दरश्रेणीनुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. लघु व्यवसायांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सवलतीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

स्थानिक व्यापारी प्रणयकुमार बंडी यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, हे नवीन शुल्क दर सर्व व्यापाऱ्यांना व नागरिकांना सुलभपणे उपलब्ध व्हावे यासाठी गुजरी व आठवडी बाजार परिसरात प्रमुख ठिकाणी शुल्क निर्धारण फलक लावण्याची विनंती केली आहे.

त्यांनी निवेदनात पुढील मागण्या केल्या:

1. नवीन दरांची माहिती फलकाव्दारे व्यापाऱ्यांना व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी.

2. फळकाटे स्पष्ट व नेमके असावेत जेणेकरून कुणाही वाहनधारक व व्यापाऱ्याला गैरसमज होणार नाही.

3. कोणीही अनधिकृत वसुली करू नये, यासाठी स्पष्ट फलकावर दंडाची सूचना लावावी.

4. अनधिकृत वसुली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

प्रणयकुमार बंडी यांनी सांगितले की, फलक लावल्याने पारदर्शक व्यवहार होईल आणि व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान होणार नाही.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये