ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथे शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक

जिल्हाप्रमुख ऍड. धानोरकर यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    चंद्रपूर जिल्हा शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख अड. युवराज धानोरकर यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना शिंदे गटाची चंद्रपूर तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला दोन्ही विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, संघटक, तालुका प्रमुख तथा अन्य पदाधिकारी उपस्थित होते.सदर बैठकीत येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख अड. युवराज धानोरकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत कार्यकर्त्यांनी क्षेत्रातील नागरिकांची थेट संपर्क साधत पक्षाचे संघटन वाढविण्याच्या सूचना दिल्या व विधानसभा क्षेत्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कठोर प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यावेळी अड. धानोरकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या. बैठकीला अक्षयकुमार पवार, संदीप भोयर,कार्तिक निकोडे, विनोद चांदेकर, पंकज वडेट्टीवार, सतीश पाल्लेवार,वाणी सदालावार, शैलेश सदालावार, माया मेश्राम, प्रतीमा ठाकुर,सुनील टेकाम, अरविंद धिमान, शेख जमील, चंदन त्रीलोकानी, उमेश कुंडले, विशाल नागुलवार,संतोष इप्पलवार, संजयकुमार शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये