अर्णव पाथ्रीकर दिल्ली येथे सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रभात किड्स अकोला येथील फर्स्ट स्टॅंडर्ड चा विध्यार्थी अर्णव अभिषेक पाथ्रीकर याने स्पेल वेल इंडिया या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम येण्याचा मान पटकाविला असून तो चॅम्पियन ठरला आहे.
नुकताच त्याचा आय. आय. सी. दिल्ली येथे स्पेल वेल इंडिया चे मान्यवर संचालक यांचे हस्ते एका छानदार सोहळ्यात गौरव करण्यात आला. सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, आठ हजार रुपये रोख, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अर्णव हा माहेर कलेक्शन,अकोला चे संचालक अभिषेक पाथ्रीकर, व सौ. रेणू पाथ्रीकर यांचा मुलगा तसेच सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष पाथ्रीकर, व सौ. प्रतिभा पाथ्रीकर,जे. टी. कराळे, अकोला यांचा नातू आहे.
स्कुल ऑफ स्कॉलर्स च्या प्राचार्या मनीषा उंबरकर, प्रभात किड्स चे संचालक डॉ. गजाननराव नारे यांनी अभिनंदन केले आहे. अर्णव चे सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदन होत आहे.