5 जुलै रोजी देऊळगावराजा बस स्थानकावर माईक व ऍम्प्लिफायरची व्यवस्था करण्यासाठी जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने भीक मांगो आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा बस स्थानकावर प्रवाशांना व बस चालकांना सूचना देण्यासाठी माइक व ऍम्प्लिफायर उपलब्ध नसल्यामुळे वाहतूक नियंत्रक यांना प्रवाशांना सूचना देता येत नाही. 3 ते 4 कोटी रुपये खर्च करून देऊळगाव राजा बस स्थानक बनविण्यात आले तरी प्रवाशांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही तीन ते चार महिन्यापासून देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात चोरीचे प्रकरण वाढत आहे काही दिवसा अगोदर डिग्रस गावचे प्रवासी हे जालना दवाखान्यात जाण्यासाठी बस स्थानकावरून एसटी मध्ये जात असताना प्रवाशाच्या खिशातून 20 ते 25 हजार रुपये चोरांनी चोरले व एसटी बस ही देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला घेण्यात आली.
असे प्रकरण प्रवाशांच्या सोबत घडत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण होत आहे याच्या अगोदर जय शिवसंग्राम संघटनेचे वतीने मा. विभाग नियंत्रक विभागीय नियंत्रक कार्यालय बुलढाणा यांना दिनांक:06 जुन रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. मात्र या निवेदनाची जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक:05 जुलै रोजी 11 वाजता जय शिवसंग्राम संघटनेचे वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. त्यातून उद्भवणाऱ्या प्रत्येक परिणामाची जबाबदारी ही राज्य परिवहन महामंडळ अधिकाऱ्याची राहील.
असे निवेदन देण्यात आले निवेदनावर स्वाक्षऱ्या. तालुका अध्यक्ष जहीर खान पठाण, शहराध्यक्ष अजमत खान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, मुबारक चाऊस, किशोर वाघ, आयाज खान पठाण, राजेश भाग्यवंत, असलम खान, राजू गव्हाणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.