चाकूचा धाक दाखवित लाखोची रक्कम पळविली
गुन्हा नोंद _ संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी अनुराग गोपालदास चांडक राहणार वायगाव निपाणी यांनी तक्रार दिली की दिनांक 29.6. 2025 रोजी किराणा माल पवन गोपाळराव ढेंगरे रा वैष्णवी कॉम्प्लेक्स वर्धा याचे मालवाहू गाडी क्रमांक एम एच 32 एजे3614 मध्ये भरून नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ येथे रतनदीप देशमुख यांना देऊन मालाचे दहा लाख रुपये घेऊन सदर चालक यवतमाळ येथे आला व यवतमाळ येथून फिर्यादी यांचे सांगणे वरून चिल्लर किराणा 57 हजार 80 रुपयाचा खरेदी करून उर्वरित रक्कम 9,42,920 रुपये घेऊन परत येत असता देवळी ते वायगाव रोड वडद गावाजवळपास तीन ते चार इस्मानी गाडीचे समोरील काचावर दगड मारून गाडीचा काच फोडून गाडी थांबून चाकूचा धाक दाखवून सदर रक्कम पळून नेली असे चालक पवन ढेंगरे यांनी मालक यांना सांगितल्यावरून मालक अनुराग चांडक यांनी पोलीस स्टेशन देवळी येथे तक्रार दिल्याने त्यांचे तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या गाडीवरील चालक पवन ढेंगरे यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे बयानात व घटनेमध्ये विसंगती दिसत असल्याने सखोल विचारपूस केली असता पवन ढेंगरे यांनी सांगितले की त्याला पैशाचे काम असल्याने त्यांनी स्वतःच सदर गाडीचा काच फोडून पैसे गाडी पासून एक किलोमीटर अंतरावर समोर लपवून ठेवले व लुटमारी किल्ल्याचा बनावा करून फिर्यादी यांना सांगितले असे सांगितल्याने सदर चालक यास अटक करून त्याने लपून ठेवलेल्या ठिकाणावरून त्यांनी दाखविल्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील 9,42 ,920 रुपये जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास माननीय पोलीस अधीक्षक, अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग पुलगाव राहुल चव्हाण प्रभारी ठाणेदार यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेश मगरे अश्विन गजभिये, कुणाल हिवसे, मनोज नप्ते, प्रफुल कोडापे, विकास देवतळे यांनी दिनांक 30.6.2025 रोजी सदर गुन्हा उघडकीस आणून सदर गुन्हयातील आरोपीस अटक करून गुन्हयातील संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.