व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर : शालेय जीवन संपल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर “१२वी नंतर काय?” हा महत्त्वाचा प्रश्न उभा ठाकतो. याच प्रश्नाचे योग्य उत्तर शोधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची योग्य दिशा मिळावी यासाठी आज दि. २ जुलै २०२५ रोजी महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे जीवन कौशल्य व व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट कंपनी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व कॅलिबर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते. तर मार्गदर्शन करण्यासाठी हेमांगी विश्वास, अंकिता कुचनकर, पौर्णिमा बारापात्रे व प्रणय येरोजवार उपस्थित होते. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप परसूटकर, कॅलिबर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. आशिष देरकर व कनिष्ठ महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली वाटेकर यांनी केले तर आभार प्रा. आशिष देरकर यांनी मानले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध कौशल्य विकास, करिअर पर्याय व व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती देऊन त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात आले. अल्ट्राटेक कंपनीच्या सीएसआर उपक्रमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्य घडविण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.