ताज्या घडामोडी

प्रवचनातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन

आयुष्यमान भारत कार्डाचे वितरण, शिकवणी वर्गासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी

चांदा ब्लास्ट/गणेश शेंडे *देवळी प्रतिनिधी*:

देवळीतील मिरननाथ महाराज पटांगणावर बालयोगी गोपाल महाराज यांचे प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना आरोग्य सुविधा व विद्यार्थ्यांच्या शिकवणीसाठी मोफत शैक्षणिक ज्ञान मिळावे याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये कुटुंबीयांना पाच लाखाची आरोग्य सुविधा मिळवून देणारी आयुष्यमान भारत कार्ड योजना व विद्यार्थ्यांच्या शिकवणी करिता पुणे येथील शिक्षण ॲपच्या माध्यमातून वर्ग पाच ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गासाठी निःशुल्क योजना देणाऱ्या योजना चा शुभारंभ यावेळी करण्यात आला. योजनेची सुरुवात आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते राजेश बकाने यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली या दोन्ही योजनेच्या शिबिरात लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद राहिला यावेळी एक हजार आयुष्यमान भारत कार्डाचे वितरण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गासाठी 20,000 विद्यार्थ्यांची नोंदणी चा यावेळी शुभारंभ करण्यात आला. तसेच शिक्षण ॲप डाऊनलोड करून विद्यार्थी शिकवणी वर्गा करिता नोंदणी करू शकतात. अशी माहिती या वेळेला दिली. एक आठवडा रात्रीला बालयोगी गोपाळ महाराज यांचे प्रवचन आणि दिवसाला विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या शिबिरातून गजू लाभार्थ्यांना लाभ मिळाला. आयुष्यमान भारत योजनेत वेगवेगळ्या 1300 आजाराचा सर्जरी उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत संपूर्ण कुटुंबासाठी पाच लाख रुपये आरोग्याची हमी देण्यात आल्या असल्याची यावेळी माहिती दिली. प्रत्येक कुटुंबांनी आपले आधार कार्ड देऊन आयुष्यमान कार्ड बनवावे असे असे यावेळी जाहीर करण्यात आले . तसेच मोफत शिकवणी ही केंद्र सरकारची योजना गरीब घटकांच्या विद्यार्थ्या ंपर्यंत पोचविण्यात आपण सर्वांनी काम करावे असे मत आमदार समीर कुणावर यांनी व्यक्त केले.
********”*”””””****†*******

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये