महाविद्यालय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडविण्याकरिता कॅम्पचे आयोजन करा
गोंडवाना यंग टीचर्स संघटनेची सहसंचालक यांचेकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
– तत्कालीन मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजीच्या गडचिरोली दौऱ्या दरम्यान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सी सलग्नित महाविद्यालयाचे प्रश्न सोडण्याकरता दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे कॅम्प आयोजित करण्याकरता निर्देशित केलेले होते. त्यानुसार मा. सहसंचालक (उच्च शिक्षण) नागपूर विभाग नागपूर यांनी नियमितपणे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी कॅम्प आयोजित करून महाविद्यालय व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न व इतर प्रकरणे निकाली काढत होती. मात्र अनेक महिन्यापासून सदर कॅम्प बंद झाल्याने सदर कॅम्प पूर्ववत सुरू करावे या संदर्भात गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन द्वारा संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे,सचिव डॉ.विवेक गोर्लावर,डॉ.नरेंद्र हरणे डॉ.उमेश इंदुरकर यांनी सहसंचालक डॉ.संतोष चव्हाण यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
मागील अनेक महिन्यापासून मा. सहसंचालक (उच्च शिक्षण)नागपुर विभाग कार्यालय, नागपूर यांनी महाविद्यालय व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न व प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने असे कॅम्प आयोजित करणे बंद केलेले आहे.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीसी सलग्नित महाविद्यालय व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अडचणी, पदोन्नतीचे प्रकरणे व इतर बाबीकरिता मा.सहसंचालक((उच्च शिक्षण)) कार्यालयाशी नियमीत काम पडत असल्याने गडचिरोली-चंद्रपुर जिल्हाची भौगोलीक रचना बघता नागपूरला जाणे येणे करणे अत्यंत अडचणीचे आहे त्यामुळे त्यांना आर्थिक तसेच इतर त्रास सहन करावा लागत आहे.
गडचिरोली- चंद्रपुर जिल्हाची भौगोलीक रचना बघता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सी सलग्नित महाविद्यालय व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रश्न/अडचणी, पदोन्नतीचे प्रकरणे व इतर बाबी निकाली काढण्याच्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रत्येक महिन्यातून किमान दोनदा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे कॅम्प आयोजित करावे अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेने केली आहे.