वृक्ष लागवडीने कृषी दिन साजरा, पर्यावरण संरक्षणासाठी कृषी दुतांचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथिल रावे विद्यार्थी यांनी कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रम गिरोली बुद्रुक व गिरोली खुर्द येथे आयोजित केले. कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर गावातून कृषी दिंडी काढण्यात आली व वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक कृषी अधिकारी डी. एम. शिंगणे यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. गावाचे सरपंच राजु म्हस्के यांनी कृषी दिनाचे महत्त्व स्पष्ट करून गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली.
कार्यक्रमात समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्रा. विजय पवार व प्रा. अरुण शेळके यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. जि. प. शाळा, गिरोली खुर्द चे मुख्यध्यापक पवार व शिक्षक वाघ यांनी कार्यक्रमास सक्रिय सहभाग दर्शवला .कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
विद्यार्थी संकेत पांढरे यांनी सूत्रसंचालन व वरद मोताळे यांनी आभारप्रदर्शन केले. निखिल मुरकुटे, धनंजय मनेरी,ऋतुराज मिटकरी, ओमकार पाटील, भागवत कोल्हे, जयेश मोरे, ऋषिकेश नाष्टे, सौरभ ओइंबे, उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी पार पाडला. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सकारात्मक प्रतिसाद दिला.