ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आजपासून एस टी. मध्ये आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांस तिकीट दरात १५ टक्के सूट

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशी संख्येत वाढ करून महसुलात वाढ करण्याच्या दृष्टीने व प्रवाशांना आगाऊ आरक्षण करण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने कमी गर्दीच्या हंगामात १५१ किमी अंतरापेक्षा जास्त अंतराकरिता आगाऊ आरक्षण (रिझर्वेशन) करणाऱ्या प्रवाशांस प्रवास भाड्याच्या १५ टक्के सूट देण्याची योजना दि. ०१/०७/२०२५ पासून सुरु करण्यात येत आहे.

रा.प. महामंडळाने प्रवाशीभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने नवनवीन उपक्रम राबवून प्रवाशांना सुलभ, माफक व अपघात विरहित सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असते. त्याचाच आग म्हणून कमी गर्दीच्या हंगामात आगाऊ आरक्षण करून प्रवास करणा-या प्रवाशांना (कोणतीही सवलत नसलेले प्रवाशी) तिकीट दरात सरसकट १५ टक्के सवलत योजना सुरु करण्यात येत आहे.

सदर सवलत रा.प. महामंडळातील सर्व प्रकारच्या सेवेकरिता लागू असून, आरक्षणाचे प्रमाण वाढल्यास अतिरिक्त बसेसचे नियोजन करणे, रा.प. सेवेची गुणवत्ता सुधारण्यास रा.प. महामंडळास मदत होवून प्रवाशांच्या सेवेत सुधारणा करण्यास मदत होईल. सदरची सवलत हि कोणतीही सवलत नसलेल्या (पूर्ण तिकीटधारी) सर्वसाधारण प्रवाशांकरिता आहे.

Oplus_131072

१५ टक्के सवलतीचे भाडे खालीलप्रमाणे :

बसचा प्रकार :

 १. शिवाइ, प्रवास मार्ग चंद्रपूर ते नागपूर, मूळ प्रवास भाडे आरक्षणासह ४२४ रु. १५ टक्के सवलतीचे फरक आरक्षणासह ३६८ रु. फरक ५६ रु.

२. साधी, प्रवास मार्ग चंद्रपूर ते नागपूर मूळ प्रवास भाडे आरक्षणासह २६७ रु. १५ टक्के सवलतीचे फरक आरक्षणासह २२८ रु. फरक ३९ रु.

३. साधी, प्रवास मार्ग चंद्रपूर ते यवतमाळ मूळ प्रवास भाडे आरक्षणासह ३०२ रु. १५ टक्के सवलतीचे फरक आरक्षणासह २५७ रु. फरक ४५ रु.

४. साधी, प्रवास मार्ग चंद्रपूर ते अमरावती मूळ प्रवास भाडे आरक्षणासह ४६२ रु. १५ टक्के सवलतीचे फरक आरक्षणासह ३९३ रु. फरक ६९ रु.

 तिकिटांच्या आरक्षणाची सोय हि मोबाईल अप वर, रा.प. महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळावर तसेच चंद्रपूर बसस्थानकावरील वैद्रावर उपलब्ध आहेत.

सदर सवलतीचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभध्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक चंद्रपूर श्रीमती स्मिता सुतवणे यांनी केलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये