रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही म्हणून युवा पोस्टमास्टरचा गेला जीव
तालुक्यातील मुधोली येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
मध्यरात्री मुधोली येथील २५ वर्षे युवा पोस्टमास्टरला दि. २८ च्या मध्यरात्री हगवण व उलटीचा त्रास झाला त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र डॉक्टर नी तपासणी करून ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याचे सांगून १ तासात चंद्रपूरला हलवण्याचा सल्ला दिला. डॉक्टर मेश्राम यांनी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे सांगून ती दिली नाही शेवट त्याला डग्याद्वारे चंद्रपूरला सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला अखेर मृत घोषित केले.
अंकित उत्तम गायकवाड वय २५ वर्षे राहणार नेरी खांबाळा तालुका चिमुर येथील आहे. अंकित हे भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे पोस्टमास्टर म्हणून कार्यरत होते दिनांक २८ च्या मध्यरात्री त्याला हगवण उलट्याचा त्रास झाला शेजाऱ्यांनी त्याला मुधोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले डॉक्टर मेश्राम यांनी तपासणी केल्यानंतर ऑक्सिजन लेवल कमी असल्याचे सांगून एका तासात चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला मध्यरात्रीचे बारा वाजले असल्याने मुधोली गावात इतर वाहणे उपलब्ध नव्हती या करताना उपस्थित गावकऱ्यांनी डॉक्टर मेश्राम यांना रुग्णवाहिकेची मागणी केली मात्र डॉक्टरांनी ती नादुरुस्त आहे इतर वाहनाची सोय करा असा सल्ला दिला इतर वाहनाचा शोध घेता घेता तिथेच एक तास निघून गेला त्यानंतर शेवट गावातील एका डग्याद्वारे चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले डॉक्टर नी तपासणी केली असता अंकितला मृत घोषित केले डॉक्टर नी ॲम्बुलन्स असताना सुद्धा दिली नाही तसेच इतर वाहनाची सोय करून दिली नाही यामुळे युवा पोस्ट मास्टर चा जीव गेल्याचा आरोप मुधोली येथील गावकऱ्यांनी केला आहे या प्रकारानंतर जिल्हा सामान्य आरोग्य अधिकारी यांनी मुधोली येथे भेट दिली.
तुळशीराम श्रीरामे माजी जिल्हा परिषद सदस्य – प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका व चालक उपलब्ध असताना सुद्धा येथील डॉक्टर मेश्राम यांनी ते दिली नाही याबाबत डॉक्टर यांना जाब विचारला असता त्यांनी याबाबत उडवा उडवी चे उत्तर दिली अशा निर्दयी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी आरोग्यमंत्र्याकडे करणार असल्याचे श्रीरामे यांनी सांगितले