ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालय येथे वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य श्री प्रफुल माहुरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून एम सी वी सी विभागाच्या प्रमुख प्रा आरजू आगलावे, समिती प्रमुख प्रानंदा भोयर, प्रा. आशिष देरकर, प्रा प्रदीप परसुटकर उपस्थित होते. स्व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपप्राचार्य माहुरे यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे संचालन प्रा नरेंद्र हेपट यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा नरेंद्र हेपट यांनी केले.