देऊळगाव राजा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार श्री राहुल भाऊ बोंद्रे यांच्या निर्देशानुसार, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी, कष्टक-यां संबंधात जे बेताल वक्तव्य केले त्याचा निषेध म्हणुन, काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी सकाळी अकरा वाजता बस स्टँड चौक देऊळगाव राजा येथे भाजप आमदार लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले.
शेतकरी कष्टकरी विरोधी आमदारावर योग्य ती कार्यवाही करण्या संबंधातील निवेदन मा. तहसिलदार साहेब यांच्या मार्फत मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, महोदयांना सादर केले
यावेळी काँग्रेस पक्षाचे तसेच महाविकास आघाडी चे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रामदास डोईफोडे, शहर अध्यक्ष अतिश कासारे, जेष्ठ नेते रमेश कायंदे, अनिल सावजी, हनीफ शहा, गंगाधर जाधव, गोविंदराव झोरे, राजेश इंगळे, अनिल शिवरकर, गणेश सवडे, बाळुभाऊ शिंगणे, हरीश शेटे, रामेश्र्वर वायाळ, प्रकाश राजे, नासेर भाई, रामू खांडेभराड, प्रा अशोक डोईफोडे, मुन्ना ठाकूर, इस्माईल बागवान, मुबारक खान, रवी इंगळे,यश कासारे, इरफान पठाण तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.