ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंचायत समिती कोरपना येथे कृषी दिन कार्यक्रमात शेतकरी हवामान बदल आधारीत तंत्रज्ञान विकसित करा – विजय पेंदाम    

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

        महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन म्हणून कोरपणा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून हरितक्रांतीचे जनक व राज्यांमध्ये 1968 ते 72 या कालावधीमध्ये पडलेल्या तीव्र दुष्काळ व संकटाचा सामना करत असताना निर्भीडपणे व दृढ निश्चय करून कृषीमध्ये क्रांती आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीअसा निर्धार करून कृषी विद्यापीठ संकरित वाणाची निर्मिती उत्पादनामध्ये वाढ उद्योग क्रांती यासह शेतकऱ्यांमध्ये नावीन्यपूर्ण शेतीसह सिंचनाचं क्षेत्र विकसीत करणारे मुख्यमंत्री म्हणून समाजामध्ये मातीशी नातं जुळलेल्या वसंतराव नाईक यांच्या कृषी दिनाचे उचित साधून या ठिकाणी शेती विषयक व शासकीय योजनेचे लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी समोर यावे याचबरोबर शेतीमध्ये क्रांती करावी असे आवाहन स् गटविकास अधिकारीविजय पेंदाम यांनी आवाहन केले हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी वसंतराव नाईकांच्या आठवणीला उजाळा देत शेतीमध्ये झालेला बदल व यावर आधारित तंत्रज्ञानाची गरज व्यक्त केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते सय्यद आबिद अली यांनी महाराष्ट्रामध्ये 1970 ते 72 या कालावधीतील दुष्काळाची भयानक स्थिती त्यावेळी परदेशामध्ये जनावरे खाणारे मिलो जवारी मक्का अन्य धान्याचा तुडवळा राज्यामध्ये पडला होता पाण्यासाठी वन वन हिंडण्याची पाळी ग्रामीण भागामध्ये विदारक चित्र निर्माण झाले होते त्यावेळेस जंगल व्याप्त क्षेत्र होता प्रदूषण पर्यावरण याचा समतोल होता.

अशाही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री असतानावसंतराव नाईक यांनी केलेली कामगिरी ही विसरता येणार नाही हरितक्रांती उत्पादनामध्ये वाढ ही सर्व काही त्यांच्या प्रयत्नातून साकार झालेलं आज आपण पाहतोय आज जगाच्या पातळीवर तापमानाने हैदोस घातला तर दुसऱ्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रदूषण पर्यावरणामुळे मानव जातीचे आरोग्य धोक्यात आलं अशी परिस्थिती आज असतानाजल जंगल जमीन याच शोषण होत असल्यामुळे कोरोना सारख्या भयानक संकटाच्या काळात सावरण्याचा काम देशांमध्ये झालं असं असताना सर्वत्र जंगल प्राप्त क्षेत्रामध्ये याचा परिणाम अल्प प्रमाणात दिसून आला मात्र ज्या ठिकाणी अधिक विकसित शहर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेकांना जीव गमावावी लागली ऑक्सिजनची कमी हा भाग असला तरी जंगलाची झालेली रास हा याचा परिणाम आहे आज शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाबरोबर शेतीमध्ये धन धान्याबरोबर इतर आर्थिक दृष्ट्या परवडणारी शेती करणे गरजेचे आहे केंद्र राज्य शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीसह जमिनीची सुपीकता व जलसंधारणाची कामे करण्याची संधी शेतकऱ्यांना आहे.

शेतकरी हा कोणत्याही परिस्थितीत न थांबणारा एक चाक आहे म्हणून सर्वाधिक शेतीमधूनच पर्यावरणाचा समतोल राखता येतं यासाठी शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा पर्याय उत्तम असून भविष्यात वाढत्या औद्योगीकरणांमध्ये पावर प्लांट मध्ये पेपर मिल मध्ये बांबूची मागणी लक्षात घेऊन नदीपट्ट्याच्या काठावर नाल्याच्या काठावर पडीत जमिनीवर बांबू लागवडीचा कार्यक्रम घेऊन आपण संकल्प करूया आणि या कृषीदिनानिमित्त कोर पाण्यात तालुक्यामध्ये बांबू लागवडीची एक यशस्वी चळवळ सर्वांच्या सहकारातून आपण पुढे नेण्याचा संकल्प करू असे म्हणत आजच्या निमित्ताने सर्वांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देत शेतीमध्ये प्रगती व्हावी अशी आशा व्यक्त केली यावेळी सहाय्यक गट अधिकारी होळकर कृषी अधिकारी दूधे यांच्यासह ग्रामसेवक पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी महिला संघाच्या कार्यकर्ते सदन शेतकरी त्याचबरोबर कृषी विभागाचे कर्मचारी ग्राम रोजगार सेवक इत्यादी बहुसंख्येने उपस्थित होते.

सर्वांनी कृषी दिनाचा उत्साह साजरा करून कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आभार प्रदर्शन श्री गाडगे विस्तार अधिकारी यांनी मानले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये