ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

   दि. 01/07/2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून मौजा रिमडोह शिवार, जामकडुन हिंगणघाट कडे येणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वरील हॉटेल संस्कार जवळील मोठा मारोती मंदिर देवस्थान समोर सापळा रचुन एन.डि.पी.एस. ॲक्ट अंतर्गत कार्यवाही केली असता, आरोपी नामे 1) अंकित भाविक वावरे, वय 19 वर्ष, रा. फुकटा, आजनसरा, जि. वर्धा, ह.मु. शहालंगडी रोड संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट, जि. वर्धा, 2) खेमेश भेरूदास भुते, वय 21 वर्ष, रा. टेलंग पेट्रोलपंप मागे, संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट, हे मोक्कावर रंगेहाथ गांजा अंमली पदार्थाची वाहतुक करतांना मिळुन आले असुन, आरोपी अंकित वावरे याचे पाठीवर असलेल्या एका स्कुल बॅगमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आला. सदर गांजा अंमली पदार्थ आरोपीतांनी 3) फैजान नावाचा ईसम रा. मोमीनपुरा नागपुर याचेपासुन खरेदी केल्याचे सांगितल्याने, जागीच जप्ती पंचनामा कार्यवाही करून, ताब्यातील दोन्ही आरोपीतांचे ताब्यातुन 1) निव्वळ गांजा अंमली पदार्थ 1.037 किलोग्रॅम कि. 20,740 रू 2) एक मोरपंखी निळ्या रंगाची टि.व्ही.एस. ज्युपीटर मोपेड क्रमांक एम.एच. 49 बी.एन. 6498 कि 1,00,000 रू 3) एक सॅमसंग कंपनीचा ॲन्ड्रॉईड मोबाईल कि. 15,000 रू 4) एक रिअरमी कंपनीचा ॲॅंन्ड्रॉईड मोबाईल कि. 15,000 रू, 5) एक स्कुल बॅग कि. 250 रू, असा जु.कि. 1,50,990 रू चा मुद्देमाल जप्त करून, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे कलम 8(क), 20(ब) ii(ब), 29 एन.डी.पि.एस ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, जप्त मुद्देमाल व दोन आरोपीतांना पो.स्टे. हिंगणघाट यांचे स्वाधीन करण्यात आले आहेत.

 सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन साहेब यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नि. अतुल थुल(पो.स्टे. हिंगणघाट), पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व फॉरेन्सिक विभागाचे स.फौ. अनिल साटोणे, अजित धांदरे, पो.हवा. मंगेश धामंदे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये