अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ च्या वतीने जामणी येथे आरोग्य शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्रटेक सिमेंट माणिकगड च्या वतीने जामणी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन 25 जुन रोजी करण्यात आले. या शिबिरात जामणीतील ७४ ग्रामस्थांनी लाभ घेतला.
सध्या पावसाळा सुरू असल्याने गावात आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत आहेत. अल्ट्राटेक सिमेंट माणिकगड कंपनी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सतत कार्यशील असते. हे आरोग्य शिबीर नोबेल शिक्षण संस्था आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड सिमेंट वर्क्स (CSR) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
यावेळी गोपाल पोर्लावार, प्रकल्प समन्वयक वैभव टेंगसे, वैद्यकीय अधिकारी मधुकर मंत्रा, समुपदेशक सन्नी वारखडे, ORW मयूर जनावडे आणि सीन यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्व ग्रामस्थांना या शिबिराचा नक्कीच फायदा होईल. या आरोग्य शिबिरात रक्त तपासणी सुद्धा झाली.
सर्व गावकऱ्यांनी आणि गावातील सरपंचांनी अल्ट्राटेक सिमेंट माणिकगढ कंपनीचे धन्यवाद मानले.