9 महिन्यापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
याप्रमाणे आहे की यातील फिर्यादी यांनी दि. 27/03/2024 रोजी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 13 वर्षे हिला दि.27/03/2024 रोजी अंदाजे दुपार दरम्यान यातील कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावुन पळवून नेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अप क्र. 522/2024 कलम 363 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचा तपास वर्धा शहर यांना न लागल्यामुळे गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा कडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास मा. श्री अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा पथक यांना दिलेल्या आदेशानुसार करण्यात आले. गुन्ह्यात मुखबिर लावून व तांत्रिक तपास करून यातील आरोपी याचा शोध घेण्यात आला. त्याअनुषंगाने यातील आरोपी नामे शुभम विठ्ठलराव ठाकरे वय 29 वर्ष, रा. सिंदी मेघे वर्धा यांने पिडीत मुलीस लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेल्याचे निष्पन्न झाल्याने आज दिनांक 17/01/2025 रोजी पिडीत मुलगी व आरोपी हे दोघेही श्रीकृष्ण नगर, जामनेर जिल्हा जळगाव येथे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच यातील पीडित अल्पवयीन मुलीस व आरोपीस रितसर कायद्याप्रमाणे वरिष्ठांचे आदेशाने पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे ताब्यात देण्यात आले.असून पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा शहर करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर रतनकुमार कवडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक पो.नि. विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक माधुरी वाघाडे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले आदेशाअन्वये स.फौ. सुभाष राऊत, पो.हवा. नितेश मेश्राम, म.पो.हवा. शबाना शेख, पो.शि. नवनाथ मुंडे असे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा आणि पो.हवा. अक्षय राऊत, गोविंद मुंडे सायबर सेल वर्धा यांनी केली.