ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भाजपा सेवा केंद्रात अभिवादन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) : येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे गुरुवार, २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या समाजसुधारणेतील योगदानाचा गौरव करताना सांगितले की, “छत्रपती शाहू महाराज हे समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे महान पुरस्कर्ते होते. दीन-दुबळ्यांचे कैवारी म्हणून त्यांनी वंचितांना हक्क मिळवून देण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था लागू केली. त्यांच्या कार्यातून समाजाला नवसंजीवनी मिळाली.”

कार्यक्रमावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, ज्येष्ठ नेते चिन्नाजी नलभोगा, संदीप तेलंग, हनुमान खडसे, गणेश अँड्रस्कर, मनोज महेशकर, उगम बुरड, आयुष नागरकर, निखिल आत्राम, राकेश उरकुडे, मंगेश उलमाले, गौरव तुराणकर, आकाश वेलादी, सविता अँड्रस्कर, खुशबू मेश्राम, भारती परते, नेहा कुम्मरवार, प्रिया नागभीडकर, स्वाती गंगाधरे, मयुरी धुर्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये