तालुकास्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये लखमापूर शाळेने मारली बाजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तालुका स्तरीय बाल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा दिनांक 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी 2025 दरम्यान झाल्या, या बाल क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील पाच बीटा मधून लखमापूर शाळेने प्राथमिक मुली कब्बडी प्रथम क्रमांक, उच्च प्राथमिक मुली कब्बडी द्वितीय क्रमांक,
रिले रेस प्राथमिक प्रथम क्रमांक
४०० मीटर धावणे उच्च प्राथमिक मुली प्रथम क्रमांक.
थाळी फेक उच्च प्राथमिक मुली द्वितीय क्रमांक.. पटकाविला.
अश्या घवघवीत लखमापूर शाळेच्या यशाने तालुक्यातून नांदगाव (सूर्य )बिट प्राथमिक,माध्यमिक,आणि जनरल चॅम्पियन ठरली…
सदरच्या स्पर्धा… पंचायत समिती कोरपना चे गटशिक्षण अधिकारी श्री सचिन मालवी यांच्या मार्गदर्शनातून पाच ही बिटा चे शिक्षण विस्तार अधिकारी तथा सर्व केंद्राचे केंद्र प्रमुख सोबत सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या नेतृत्वात पार पडल्या.सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कढोली (खु) येथे करण्यात आले होते.
नांदगाव बीटा चे शिक्षण विस्तार अधिकारी तथा कोरपना पं. स चे गटशिक्षण अधिकारी श्री सचिन कुमार मालवी यांनी भोयगाव , बाखर्डी केंद्राचे केंद्र प्रमुख सुनिल कोहपरे साहेब तथा लखमापूर शाळेचे मु अ.श्री क्षीरसागर यांचे भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या