ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा माजी आमदार बच्चू कडू यांच्या जनआंदोलनास पाठिंबा जाहीर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील जनआंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माजी आमदार बच्चू कडू यांना पाठवलेल्या पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे.

माजी आमदार बच्चू कडू हे शेतकरी, दिव्यांग आणि समाजातील वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. “आपण जनसामान्यांच्या हितासाठी नेहमीच संघर्ष करत आला आहात. आपल्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष सातत्याने विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे, ही बाब अभिनंदनीय आहे,” असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे.

माजी आमदार कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या मागण्या जनसामान्यांच्या हिताच्या असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांना आपला आणि आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे. “जनप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न शासनासमोर मांडणे आणि ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण करत असलेले हे आंदोलन निश्चितच सकारात्मक परिणाम घडवेल अशी मला आशा आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी माजी आमदार बच्चू कडू यांच्या या लढ्यात आपण खंबीरपणे त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये