ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी अभियानामुळे शेतकरी विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य – डॉ.नितीन मेहेत्रे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

विकसित कृषी अभियानाद्वारे शेतकरी संवाद हा कायम सुरू राहावा अशी अपेक्षा व्यक्त करून या अभियानामुळे शास्त्रज्ञांना संशोधनाची व शेतकऱ्यांना नवीन शेती पद्धतीची दिशा मिळेल असे प्रतिपादन समर्थ कृषी महाविद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे यांनी केले.

शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार,भारतीय कृषी अनुसंधान परिषद,नवी दिल्ली अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा , ईश्वत बायोटेक लिमिटेड सिंदखेड राजा,कृषी विभाग आत्मा बुलढाणा, कृषी विभाग देऊळगाव राजा,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय दे. राजा वतीने सुरू असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ च्या समारोपप्रसंगी शेतकरी, विद्यार्थी,कृषी विभागाचे कर्मचारी, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधताना त्या बोलत होत्या .केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृषी अनुसंधान परिषद ,नवी दिल्ली यांनी सुरू केलेले हे अभियान अतिशय उत्कृष्ट आहे. अशाप्रकारचे चर्चासत्र वर्षभरात खरीप रब्बी मध्ये चालू राहिल्यास शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील व शेतकरी विद्यार्थी व शास्त्रज्ञ यांना काम करण्याची दिशा मिळेल असे त्या म्हणाल्या. ईश्वेद समूहाचे संचालक भानुदास वायाळ संजय वायाळ व अक्षय वायाळ यांनी ऊती संवर्धन विषयी व केळी, बांबू , खजूर या फळबाग पिकांची माहिती दिली तसेच आगामी काळामध्ये शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड करून शेतीचे उत्पन्न कसे वाढवता येईल असे सांगितले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अमोल झापे यांनी बुलढाणा जिल्ह्यात चालू असलेले अभियानाबद्दल सविस्तर माहिती दिली. कृषी संशोधन केंद्राचे डॉ. दिनेश कानवडे यांनी भरडधान्य व मका पिक तंत्रज्ञान घेऊन उत्पन्न कसे वाढवता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली.

शेतकऱ्यांनी पिकावर पडणारे कीड व रोग याचे नियंत्रण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच कृषी विभाग आत्मा,बुलढाणा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे यांनी कृषी विभागाअंतर्गत चालणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.प्राचार्य डॉ.नितीन मेहेत्रे यांनी कापूस, तूर ,सोयाबीन याबाबत शेतकरी व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.राष्ट्रीय माती सर्वेक्षण आणि भूमी वापर योजना विभाग चे शास्त्रज्ञ डॉ. दास, डॉ. सुरेंद्रन ,डॉ.निर्मल कुमार यांनी संपूर्ण अभियानात शेतकऱ्यांसोबत माती व पाण्याची परीक्षण करून उत्पन्न कसे वाढवता येईल याबद्दल माहिती दिली.तसेच कृषी क्षेत्राला प्रथम दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगत शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळात फळबाग लागवड,ड्रोन द्वारे फवारणी करणे शेतकऱ्यासाठी फायद्याचे आहे असे सुचविले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक दंदाले यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण एंव‌ भूमी उपयोग नियोजन ब्युरो नागपूरचे शास्त्रज्ञ डॉ. दास, डॉ. सुरेंद्रन,डॉ.निर्मल कुमार,डॉ.सुनील कुमार , ईश्वेद समूहाचे भानुदास वायाळ, अक्षय वायाळ, कृषी संशोधन केंद्राचे डॉ. दिनेश कानवडे,कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.अमोल झापे, डॉ.वाडकर, डॉ. देशमुख, प्रा.देशपांडे,प्रा.करडे,कृतिका गांगडे,अनुराधा जाधव,अनिल जाधव, नंदकिशोर ढोरे,कोकिळा भोपळे प्रकल्प संचालक आत्मा, बुलढाणाचे पुरुषोत्तम उन्हाळे व तालुका कृषी अधिकारी भगवान कछवे, दे. राजा, सचिन काळे,दिलीप वाघ,नंदकिशोर शिंगणे, श्रीकांत पडघान,अनंता देशमुख तसेच समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मेहेत्रे, प्रा. चगदळे,प्रा. म्हस्के,प्रा.अश्विनी जाधव,विद्यार्थी प्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थ व ईश्वर समूहाचे कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. नितीन मेहेत्रे, प्रा.चगदळे,प्रा. म्हस्के, श्रीकांत पडघान व ईश्वेद समूहाचे अक्षय वायाळ यांनी परिश्रम घेतले.या अभियानात बुलडाणा जिल्ह्यातील एकूण १५० गावात शेतकऱ्यांशी खरीप पिकाबद्दल तसेच नवीन तंत्रज्ञान व संशोधन याविषयी चर्चा केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये