ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भटके विमुक्त कल्याणकारी बहू. संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

समाजातील सर्व घटनांना लाभ मिळून देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

भटके विमुक्त कल्याणकारी बहुद्देशिय संस्था विदर्भ प्रांत- भंडारा द्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व भटके विमुक्त -घुमंतू समाजाकरिता श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत भटके विमुक्त समाजास विविध प्रकारचे दाखले आधारकार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जात प्रमाणपत्र व इतर दाखले देण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री विनय गौडा यांना निवेदन देण्यात आले यावेळी श्रीकांत तिजारे, विदर्भ प्रांत सह संयोजक, राहुल आवरकर-आयाम प्रमुख, शरद सोंनकुसरे, जिल्हा संयोजक हे प्रामुख्याने उपस्थित होते.

 मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री महसूल तथा पालक मंत्री नागपूर जिल्हा यांनी VC व्दारे दिनांक २१/०५/२०२५ रोजी दिलेले निर्देशनुसार श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत भटके विमुक्त समाजास विविध प्रकारचे दाखले आधारकार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जात प्रमाणपत्र व इतर दाखले देण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्याबाबत महाराष्ट्रातील सर्व तहसिदार यांना सुचित केले आहे.

 त्याच अनुषगाने भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेचे कार्यकर्ते संपुर्ण विदर्भ प्रांतात या अभियान निमित्याने वस्ती- वस्तीवर जात आहेत व त्यांचे सर्वेक्षण करीत आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील देखील अनेक वस्त्यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्या वस्त्यांवर वरील कागदपत्र देण्याचे अभियान आपल्या कार्यालयातील संबंधीत अधीनस्त अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे मार्फत सुरू करावे अशी विनंती भटके विमुक्त कल्याकारी परिषद, विदर्भ प्रांत, भंडारा च्या वतीने या निवेदनात करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये