ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

गोंडवाना विद्यापीठच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश नायडू यांची निवड

नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांकडून राजेश नायडूचे अभिनंदन

चांदा ब्लास्ट

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तर्फे दिनांक 27 जून 2023 ला क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे एक पत्र काढून चंद्रपूरचे पहिले शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू राजेश नायडू यांची गोंडवाना विद्यापीठच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५७ (२) अंतर्गत गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती झाल्याबद्दल सर्वाकडून राजेश नायडू यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राजेश नायडू हे आंतरराष्ट्रीय स्तराचे क्रीडापटू असून त्यांना महाराष्ट्राचा सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार 1994 सालासाठी देण्यात आला आहे. राजेश नायडू हे सात वेळा हँडबॉल खेळासाठी भारताचे प्रतिनिधित्व केलेले असून दोन वेळा ते उपकर्णधार आणि एक वेळा भारतीय विद्यापीठ संघाचे कर्णधार म्हणून खेळलेले आहे. तसेच त्यांना 1992 साली झालेल्या युथ कॉमनवेल्थ हँडबॉल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय रौप्य पदक आणि 1995 मध्ये झालेल्या साऊथ एशियन हँडबॉल चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक मिळालेला आहे. आज ते पार्थशर समाचार नावाने स्वतःचा न्यूज चॅनल चालवत आहेत तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित शिक्षक सेनाचे ते चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष आणि गडचिरोलीचे संपर्क प्रमुख आहेत.

गोंडवाना विद्यापीठ, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत खेळाडूंच्या उत्तरोत्तर प्रगतिच्या दृष्टिने मला मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन करता येईल याचा मला आनंद आहे. तसेच मी या संधीचा लाभ घेऊन विद्यापीठ व संपूर्ण क्रीडाक्षेत्रातील खेळाडूंचा जास्तीत जास्त चांगले करण्याचा प्रयत्न करील असे राजेश नायडू यांनी याप्रसंगी बोलले आहे. आणि आपल्या नियुक्तीसाठी त्यांनी माननीय कुलगुरू, मा. प्रभारी कुलगुरू, मा. कुलसचिव, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग आणि इतर हितचिंतकांचे आभार व्यक्त केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये