कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी विभाग व अंबुजा फाऊंडेशन मार्फत संयुक्त कृषी दिन साजरा

कृषी क्षेत्रात महिलांचा सन्मान झाला पाहिजे - गावडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. एक जुलै हा महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना हरित क्रांती,पंचायत राज,आणि रोजगार हमी चे जनक मानतात.यांचे सन्मानार्थ कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.या अनुषंगाने येथील पंचायत समितीच्या सभागृहात शेतकरी दिन साजरा करण्यात आला. व या निमित्याने शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.यात अंबुजा सिमेंट फाऊंडेशन मार्फत या वर्षी ९८ टेरेस, ५७ शेततळे,२४ माती बंधारे व सिमेंट बंधारे उपसने व तो गाळ शेतकऱ्याच्या शेतात टाकणे यासारखे कामे झाले असून शेतकऱ्यांसाठी नेहमी शेती मार्गदर्शनाचे काम करीत आहेत. असे अंबुजा सिमेंट फाऊंडेशन चे तालुका समन्वयक महेश उपरे यांनी सांगितले. यावेळी कृषी विभाग मार्फत विविध योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुका कृषी अधिकारी गावडे यांनी शेतकऱ्यांसाठी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन काम करत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास होतो आहे यासाठी अभिनंदन केले.यावेळी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन चे तालुका समन्वयक महेश उपरे,कृषी पर्यवेक्षक देशमुख तर शेतकरी प्रतिनिधी दत्ता कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी आत्राम यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये