जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पाणी कर व घर करात 50 टक्के टक्के सवलत
सरपंच ज्योत्सनाताई शिंगणे यांचा कौतुकास्पद निर्णय -

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
यंदा जिल्हा परिषद शाळांच्या प्रथम शैक्षणिक सत्राला 23 जुनं 2025 पासून सुरुवात होणार असून यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाले आहे.देऊळगाव मही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण मिळत असले तरी शूटा -बूटाच्या नांदात पालकांचा कल खाजगी शाळाकडे जास्त प्रमाणात दिसून येत आहे.आपल्या गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्वक शिक्षण मिळावे व जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या मोठ्याप्रमाणात वाढावी यासाठी सरपंच ज्योत्सनाताई वसूदेव पाटील शिंगणे यांनी इयत्ता पहिली ते चौथी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एका मालमत्ता करावर ग्रामपंचायत पाणी कर व घर करा मध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचा त्यांनी आज दि. 30 में 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी 11:00 वाजता मासिक सभेच्या मिटिंग मध्ये ठराव पारित करून निर्णय जाहीर केला. सरपंच शिंगणे यांच्या कौतुकास्पद निर्णयाचे सोशलमिडियावर स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभाग अलर्ट मोडवर असून विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढीसाठी विविध उपाय योजना राबवत आहे.दि.1 जुनं ते 7 जुनं या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेणार असून त्याचबरोबर शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी इयत्ता पहिलीपासून CBSC अभ्यासक्रमाला सुरवात होणार असून गावातील पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 व जिल्हा परिषद उर्दू शाळा मध्येच दाखल करून ग्रामपंचायत च्या 50% टक्के कर सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.