ताज्या घडामोडी

कांग्रेस पक्षाचा कृषी अधिकाऱ्यास घेराव.

शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक--डॉ सतीश वारजूकर

चांदा ब्लास्ट : चिमूर..

चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नसून फसवणूक होत असल्याचा आरोप कांग्रेस चिमूर विधानसभा समनव्यक डॉ सतीश वारजूरकर यांनी पत्रकार परिषद मध्ये करीत कृषी कार्यालयात कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जाऊन घेराव करीत जॉब विचारला.

चिमूर तालुक्यात शेती उत्पादनाची वाढ, सिंचनाची असुविधा , आरोग्य ,शिक्षण यात  मागे पडला असून शासकीय योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यात कमी पडला आहे.

पीक विमा योजना अयशस्वी झाली असून हमी भाव मिळत नाही. बोगस बी बियाणे मुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे. अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळाली नाही.मालेवाडा बीज गुणन क्षेत्र बिनकामाचे झाले असून शेतकऱ्यांना कृषी कार्यालय मार्गदर्शन करण्यात यशस्वी झाले नाही.

अनेक विषयांवर कृषी अधिकारी यांच्या वर प्रश्नांचा भडिमार करीत जॉब विचारला. तेव्हा कृषी अधिकारी यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिलीत.

घेराव मध्ये डॉ सतीश वारजूकर, कांग्रेस तालुका अध्यक्ष विजय गावंडे, शहर अध्यक्ष अवि अगडे,विजय डाबरे, विलास डांगे,रोशन ढोक,  वनिता मगरे, गीतांजली थुटे, भावना बावनकर, सविता चौधरी, कमल राऊत, अभिलाषा शीरभैय्ये, नागेश चट्टे ,घनश्याम रामटेके,कमल राऊत, पपु शेख, विलास पिसे, ओमप्रकाश खैरे, राजू चौधरी, रुपचंद शास्त्रकर, अमोल जूनगरी ,राकेश साठोने आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये