ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर नगरपरिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक

अब्दुल करीम, इस्माईल ढाकवाला, प्रियंका थुलकर, पवन मेश्राम आणि मेघा भाले सभापतिपदी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

छाया मडावी, करुणा रेब्बावर आणि लखनसिंह चंदेल स्थायी समिती सदस्य

बल्लारपूर : बल्लारपूर नगरपरिषदेची विशेष बैठक दि .२०/०१/२०२६ रोजी दुपारी ४ वाजता राजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे पीठासीन अधिकारी व मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सभापति आणि स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

या विशेष बैठकीत, नवनिर्वाचित उपाध्यक्ष देवेंद्र आर्य यांची स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या पदसिद्ध सभापति म्हणुन एकमताने निवड करण्यात आली.तसेच अब्दुल करीम शेख यांची सार्वजनिक बांधकाम, इस्माईल धाकवाला यांची पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण, पवन मेश्राम यांची विकास आणि नियोजन, प्रियंका थुलकर यांची शिक्षण व मेघा भाले यांची महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी नियुक्ती करण्यात आली.

तसेच माजी नगराध्यक्ष छाया मडावी, लखन सिंह चंदेल आणि करुणा नरसिंह रेब्बावर यांची स्थायी समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

नगराध्यक्ष अलका अनिल वाढई, मुख्याधिकारी विशाल वाघ आणि विशेष सभेला उपस्थित असलेल्या सर्व नगरपरिषद सदस्यांनी नवनिर्वाचित सभापति आणि स्थाई समिति सदस्यला शुभेच्छा दिल्या.

उपनगराध्यक्षनी पदभार स्वीकारला

बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी मुख्य अधिकारी विशाल वाघ आणि अध्यक्ष अलका अनिल वाढई यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.

उपस्थित सर्व नगर परिषद सदस्य, नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उपनगराध्यक्ष ला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये