मोहित ईटनकर युवा उद्योजक म्हणून सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
भारत सरकारच्या केंद्रीय कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने नागपूर येथे नुकताच ‘किसान संमेलन’ हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात शहरातील धनश्री स्पाइसेस’चे संचालक मोहित ईटनकर या तरुणाला युवा उद्योजक म्हणून गौरविण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते नुकताच मिळाला आहे.
हालाखीच्या परिस्थितीवर मात करून मोहित ईटनकर या तरुणाने आपले एम.बी.ए चे शिक्षण पूर्ण केले. पुढे नौकरीला बगल देत त्याने व्यवसायात पाऊल टाकले. शहरात
मोहित ऑनलाईन सर्विसेस या नावाने आपला व्यवसाय सुरु केला. या व्यवसायात त्याला अल्पावधीत पैश्यासह लोकप्रियता मिळाली. पुढे कुटुंबातील मिरची कांडप व्यवसायाला आधुनिक आणि तंत्रज्ञानाची जोड देत भाऊ अक्षय ईटनकर यांच्या सहकाऱ्याने
मिरची व विविध मसाल्याचे स्वतःचे ‘मोहित स्पाइसेस’ या नावाने पॅकेजिंगचे काम सुरू केले. त्याच्या या कार्याची दखल घेत
भारत सरकारच्या केंद्रीय कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने नागपूर येथे संपन्न झालेल्या किसान संमेलनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते त्याला युवा उद्योजक म्हणून गौरविण्यात आले.
या पुरस्काराबद्दल मोहित ईटनकर यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.