जिवती शहरात ‘सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन करण्यासाठी २३ मे रोजी जिवती शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
या रॅलीत तालुक्यातील देशभक्त नागरिक, प्रशासकीय अधिकारी, तरुण, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘भारत माता की जय’ आणि ‘हम सेना के साथ हैं’ अशा जयघोषांसह ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून निघाली.
पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय असून, या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांनी सांगितले की, अशा भ्याड हल्ल्यांनी भारताला कधीही झुकवता येणार नाही. भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ९ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केले. या कारवाईत मौलाना युसूफ अझहर यासारख्या प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादविरोधी संकल्पाशी जनता ठामपणे उभी असल्याचे या रॅलीने दाखवून दिले.
रॅलीत भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, नायब तहसीलदार शील, पोलीस उपनिरीक्षक वाडिवा, वन विभागाचे करकाडे, गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्निल टेंबे, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे दुधे, केशव गिरमजी, राजेश राठोड, गोविंद टोकरे, सुनील मडावी, गोपीनाथ चव्हाण, पुरुषोत्तम भोंगळे, बापुराव मडावी, अंबादास कंचकटले, दिगांबर आंबटवाड, आनंद कदम, पुंडलिक गिरमाजी, भिमराव पवार, संतोष जाधव, पुष्पा सोयम, चेतना राठोड, सुबोध चिकटे, बालाजी माने, सांबा शिंदे, संग्राम बाजगीर, बालाजी बिरजदार, साहेबराव राठोड, राज बेल्लाळे, रामेश्वर सबुचे, टिकाराम राठोड, गोवर्धन चव्हाण, संतोष राठोड, उखंडराव चव्हाण, मोकिंद राठोड, कमलाकर जाधव, संभाजी रायवाड, बाळू ठोंबरे, रवी जेवले, कपिल राठोड, विकास सोनकांबळे, शिवाजी बोइनवाड, राहुल राठोड यांच्यासह जिवतीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.