ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा वाहतूक पोलीस विभागतर्फे संपुर्ण वर्धा जिल्हयात विशेष मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे नागरिकांनी पालन करावे या करीता मा. पोलीस अधीक्षक, सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा. अपर पोलीस अधीक्षक, सदाशिव वाघमारे साहेब, वर्धा जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक पोलीस विभागतर्फे संपुर्ण वर्धा जिल्हयात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या अनुषंगाने दिनांक २९.०५.२०२६ रोजी पेट्रोलींग दरम्यान वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथील अधिकारी पोउपनि अमोल लगड व अंमलदार सफी/४४३ अनिल तिवारी, पोहवा /१२६५ मुकेश राऊत, पोशि/९८३ प्रदिप कोवळे यांनी नमुद वाहन चालक यांना चेक केले असता वाहन धारक क्र. १) मंगेश श्रीधरराव काचोळे वय ४० वर्ष रा. गाडगे नगर मसाळा, वर्धा यांची मेडिकल तपासणी केली असता त्यांचे रक्ता मध्ये ३२.० mg% इतके प्रमाणत अल्कोहोल मिळून आले.

तसेच वाहन धारक क्र. २) रमेश रामदासजी गुरव वय ५८ वर्ष रा. केजाजी चौक गॉडप्लाट वार्ड नं. १३, वर्धा यांची मेडिकल तपासणी केली असता त्यांचे रक्ता मध्ये ७८.८ mg% इतके प्रमाणत अल्कोहोल मिळून आल्याने कलम १८५ (दारु पिऊन वाहन चालविणे), ३(१)१८१/१७७ मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. दररोज राबविण्यात येणा-या मोहीम दरम्यान संपूर्ण वर्धा जिल्हयात वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर कलम १२९/१७७ (बिना हेल्मेट), ३(१)१८१/१७७ (विनापरावाना वाहन चालविणे), १८५ (दारु पिऊन वाहन चालविणे), १८४ (धोकादायक ओव्हर स्पिड वाहन चालविणे), १८४ सी (वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे) या मोटार वाहन कायद्यान्वये वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. करीता नागरिकांना सुचित करण्यात येते की, बिना हेल्मेट मोटार सायकल, बिना सिटबेल्ट चारचाकी वाहन, अती वेगाने व दारु पिऊन वाहन चालवू नये.

वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरिकांना करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये