Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

माझ्यावरील हल्ल्यामागे शेजारी गुप्ता परिवाराचा हात – अभिषेक मालू ह्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

अज्ञात हल्लेखोरांनी सकाळी केला होता गोळीबार व पेट्रोल बॉम्ब ने हल्ला - यापूर्वीही एकदा झाला होता हल्ला तर एकदा दुकानात लागली होती आग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर बल्लारपूर

बल्लारपूर शहरातील वस्ती विभागात मालू वस्त्र भंडार चे मालक अभिषेक मालू ह्यांच्यावर सकाळी गोळीबार करण्यात आला तसेच त्यांच्या दुकानात पेट्रोल बॉम्ब फेकून दुकान जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचप्रमाणे हल्लेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एक कामगार जखमी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी संघटनांनी संतप्त बंद पाळून घटनेचा निषेध केला तसेच सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली.

वस्ती विभागातील मालू बंधूचे सर्वात जुनी मोतीलाल प्रभुलाल मालू कपड्याचे दुकान असून आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अभिषेक मालू यांनी दुकान उघडताच काही वेळाने अज्ञात तीन इसमांनी मोपेड वर येऊन दोन पेट्रोल बॉम्ब (बियर चा बॉटल मध्ये पेट्रोल )फेकून दुकान जाळण्याचे प्रयत्न केले. आणि दुकानात घुसून चाकू ने एका कामगारांवार हल्ला केला या हल्ल्यात दुकानातील नोकर कार्तिक साखरकर वय (२५) वर्ष यांचा पायाला चाकू लागला असून त्याला उपचार्थ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेत व्यापारी संघटनेचे सदस्य मालू बंधूनसह उपस्थित होते ह्यावेळी त्यांनी  सांगितले के मागील महिन्यात सुद्धा तीन इसमांनी अभिषेक मालू याचावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दीड दोन वर्षात त्यांच्यावर झालेला हा तिसरा हल्ला असुन दीड वर्षांपुर्वी शॉर्ट सर्किट मुळे दुकानाला आग लागली होती त्यात करोडो रुपयांचे कापड तसेच फर्निचर जळून खाक झाले होते. सुरुवातीला ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र सखोल तपासाअंती सदर आग पेट्रोल टाकून लावण्यात आल्याने निष्पन्न झाले होते.  सदर घटनेमागे सुरज गुप्ता ह्यांचेवार संशय व्यक्त करण्यात आला होता मात्र घटनेपासून सुरज गुप्ता फरार आहे हे विशेष.

मालू परिसरात आगामी काही दिवसांत मंगल कार्य आयोजित करण्यात आले आहे ह्या प्रसंगी कुठलाही अनुचित प्रसंग ओढवू नये ह्यासाठी मालू परिवाराने मागील काही काळापासून त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षकांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र रविवार दिनांक 7 जुलै रोजी झालेल्या हल्ल्यापर्यंत पोलिसांनी कुठलीही सुरक्षा मालू परिवाराला पुरविली नाही.

आठवड्यापूर्वी अभिषेक मालू हयांचेवर लुटण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोर त्यावेळी हातात चाकु घेऊन त्यांच्या मागे लागले होते मात्र त्यातील आरोपींना जेरबंद कण्यात बल्लारपूर पोलिसांना अजुनही यश आले नाही. दीड वर्षांपूर्वी झालेली दुकानाच्या जाळपोळीची घटना व मागील आठवड्यातील हल्ल्याचा प्रयत्न ह्या दोन्ही घटनांतील गुन्हेगार अद्यापही मोकाट फिरत असल्याने गुप्ता ह्यांचे मनोबल वाढले असुन त्यामुळेच त्यांनी गोळीबार व पेट्रोल बॉम्ब फेकण्याची हिंमत केल्याचे अभिषेक मालू ह्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असुन ह्या सर्व घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे घडत असल्याचा आरोप केला आहे. आजच्या हल्ल्यावेळी प्रसंगावधान राखुन अभिषेक मालू ह्यांनी पळ काढला नसता तर त्यांच्या जीवावर बेतले असते हे निश्चित.

पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले व्यापारी मंडळाचे राजू मुंदडा, इब्राहिम झव्हेरी, रामधन सोमाणी, गोपाल खंडेलवाल ह्यांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली असुन 24 तासांच्या आत हल्लेखोरांना जेरबंद न केल्यास शहरातील बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

पोलिसांनी गुप्ता परिवारातील दोन व्यक्तींना चौकशीकरिता ताब्यात घेतले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक असिफराजा शेख ह्यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये