मानिकगड सिमेंट विरोधात माईन्स क्षेत्रात आदिवासीचा ठिय्या प्रशासन गाढ झोपेत
कंपनीच्या दबावात पोलीसाचे आदिवासीवर गुन्हे दाखल तंत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
नकटीच्या लग्नात १७ विघण या म्हणी प्रमाणे दारिद्रयाच जिवन जगणाऱ्या आदिवासी कोलाम समाजाचा संघर्ष गत १२ वर्षापासून सुरु आहे अनेक कार्यालयात चकरा काटून हतबल झाले गेल्या ६ महिन्या पासून कुंटुबासह ठिय्या आंदोलन सुरू आहे.
मात्र प्रशासनाच्या मर्गरमठ अधिकाऱ्यांना आदिवासी कोलामाच्या वेदना व अन्यायाची साधी जाणीव झाली नाही जमीन बळावल्या उत्खनन झाल वनविभागाने तत्परतेने मोजणी खाणी ची करूण उत्खनन झाल्याचा अहवाल दिला भुमापन विभागाने कंपनीने सिमांकन नष्ट केल्यामुळे संपूर्ण जमीन भुमापन मोजणी करणे गरजेचे असल्याचा अहवाल दिला जिल्हाधिकारी यांनी जमीन भुपुष्ठ अधिकार दिला नसताना तहसिलदार व तलाठी यांनी नियम बाह्य ७ / १२ च्या इतर अधिकारात मानीकगड खदान नोंद घेऊन आदिवासी जिवन उजाळले रस्ता वहिवाटीचा बंद करुण कंपनीने अनाधिकृत बांधकाम व रस्त्यावर कब्जा कंपनीने केला ते हटविण्यात यावा असा आदेश तत्कालीन तहसिलदार नी दिला कंपनी ने ४९३ हेक्टर पेक्षा अधिक जागा बळ कावून ४ दशकात वन महसुल व खाजगी जमीन हडपल्या न्यायासाठी गरीब आदिवासी आटापिटा करत असताना आजतागायत शेकडो तक्रारीचा अहवाल सादर करण्यात आला नाही अनेक लोकप्रतिनिधि ताराकींत व लक्षवेधी सूचना दिल्या.
मात्र प्रशासनाने नेहमी चुकीची व वेगवेगळी माहिती देऊन दिशाभुल केली यामुळे आदिवासी ची फसवणुक कंपनी व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे झाली आहे मंदीरात प्रवेश बंद विघुत पुरवठा बंद रस्ता बंद पिण्याचे पाण्याचे स्त्रोत बंद मारझोड व दहशत निर्माण केल्याच्या जमीन शेती नष्ट केल्याच्या शेकडो तक्रारी महसुल व पोलीस प्रशासनाला दिल्या मात्र साधी चौकशी तर सोडा विचारपुस करण्याचे सौजन्य दाखविले नाही कंपनी दबावात कुसूंबी येथिल शांत मार्गाने आंदोलन असताना ७ गुन्हे दाखल करूण पोलासानी आम्ही न्यायसाठी नव्हे तर कंपनीच्या सुरक्षेसाठी सेवा देतो हे दाखविले यामुळे गेल्या ७ – ८ वर्षापासून निष्पाप आदिवासी कोर्टाच्या चकरा काटीत आहे.
नुकत्याच दि १४ मे ला शांतते आंदोलन असताना सुरक्षा रक्षकाच्या बळाचा वापर करूण आदिवासी ना धमकी व दम भरत कंपनी व्यवस्थापना च्या तक्रारी वरूण आदिवासी वर गुन्हा दाखल करूण दबाव तंत्रांचा वापर करीत असल्याची भावना आंदोलन कर्त्यानी बोलून दाखवित घराचे छत नाही अंगावर कपडे नाही कसायला शेती नाही कंपनीने व प्रशासनाच्या दुर्लक्षाचे बळी आमचा जात आहे आत्महत्येशिवाय पर्याय नाही राष्ट्रपतीना आम्ही निवेदन देऊन आमच्या जमीनीवर कंपनीने खदाणीत जलसंचयन केले तिथे जलसमाधी द्या.
अशी निवेदनाद्वारे विनंती करणार असल्याचे भिमा मडावी लचू आत्राम भावराव कन्नाके महादेव कुडमेथे गणेश सिडाम अरुण उद्दे यांनी केली आहे.