श्रीनिवास वारकडने ९२ टक्के मिळवत प्राप्त केले घवघवीत यश
जिवती तालुक्यातील उत्तुंग भरारीची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- माणिकगड पहाडावरील जिवती येथील स्व.माधवराव पाटील वारकड यांचे नातू श्रीनिवास यांनी राजुरा येथील स्टेला मारीस कॉन्व्हेंट मधून सीबीएससी दहावी बोर्ड परीक्षेत ९२% गुण मिळवत प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य वारकड त्यांचे सर्व मित्रमंडळी व विद्यार्थी वर्ग यांच्याकडून श्रीनिवासचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सीबीएससी बोर्ड परीक्षेत इंग्रजी विषयात ९७ गुण व सामाजिक विज्ञान विषयात ९८ गुण घेऊन श्रीनिवासने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवीत यश मिळवत शैक्षणिक वर्तुळात परिश्रमपूर्वक केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासाने प्रभाव निर्माण केला.
मूळ अतिदुर्गम, डोंगराळ, शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास जिवती तालुक्यातील विद्यार्थी स्वकर्तुत्वाने इतरत्र जाऊन मोठ्या प्रमाणात यश मिळवीत असल्याने भविष्यात जिवती तालुक्याचे नाव विदर्भाच्या शिक्षण क्षेत्रात निश्चित गाजेल याची आशा वाटते.महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात जाऊन वनविभाग,पोलीस, सैनिक, डॉक्टर्स, इंजिनियर्स,वकील, प्राध्यापक इत्यादी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांमुळे आपल्या तालुक्याचे अनमोल योगदान आहे.
घवघवीत यश मिळविणाऱ्या श्रीनिवासच्या भविष्यकालीन शैक्षणिक वाटचालीस जिवती तालुक्यातील सर्व मित्रमंडळी,विद्यार्थीवर्ग, श्रीनिवासचे आजोबा डॉ.जाधव परिवार,वारकड परिवार, गोर बंजारा तथा तालुकावासियाकडून अनंत कोटी शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत आहे.