ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवा महोत्सव मध्ये राजकुंवर महिला विद्यालयाचे घवघवीत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या अंतर्गत तुळशी फॅशन डिझाईन महाविद्यालय, बीड यांच्या वतीने आयोजित युवा महोत्सव 2026-27 नुकताच पार पडला. या महोत्सवात राजकुंवर महिला विद्यालय, वाघरूळ येथील विद्यार्थिनीनी विविध कला व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत उल्लेखनीय यश संपादन केले.

युवा उत्सवातील कविता वाचन स्पर्धेत, सरिता संतोष वासुंबे हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक गौरव मोरे (अभिनेते) यांच्या हस्ते. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत सानिया शिंदे, गायत्री वाघ आणि सानिका राठोड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. विद्यार्थिनींच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे

या महोत्सवामध्ये राजकुंवर महिला विद्यालय वाघरुळ येथील वैष्णवी सवणे ,कोमल जाधव ,हर्षा खरात व राणी बनकर यांनी विविध कला प्रकारामध्ये उत्कृष्ट सहभाग घेतला विद्यार्थिनीच्या या उल्लेखनीय यशामागे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अरुण गीते व डॉ. सरला डोईफोडे यांचे मार्गदर्शन व परिश्रम लाभले.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा

डॉ. भगवानसिंग डोबाळ, सचिन प्रा. सौ. संगीता डोबाळ, प्राचार्य राजेश जायभाये तसेच प्रा. अनिल शिंदे, प्रा. विजय देशमुख, प्रा. चंद्रमुनी जोगदंड, प्रा. समाधान एसरोदे, प्रा. प्रवीण गाडेकर, प्रा. सारेक शेख, प्रा. भगवान जोगदंड, प्रा. कु. श्रद्धा सत्कार, प्रा. दुर्गा रुपनर, प्रा. रेणुका चित्राल, संतोष जाधव, सुनील शिंदे, गजानन जोगदंड, पवन जोगदंड व सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये